Tuesday 14 January 2020

Library Exhibition on 25th November, 2019 on the Theme - Traces of Indian History


                                                                                                                                                                 
Exhibition on the theme "Traces of Indian History" was organized on 25th November 2019, in the library from 10am to 4pm.

An inaugural ceremony was started at 10am by honourable Chairman of Om Vidyalanakar Shikshan Sanstha, Mr Madhukar Narvekar, and Dr Manisha Nair Principal of Asmita College Of Arts and Commerce for Women, by cutting the ribbon and lightning of lamp.

Dr H S. Gorge honourable retired Principal of Asmita College, Mrs Trupti Waghdhare - Superintendent were also visited the exhibition. Mrs Anupama Narvekar-Secretary of Om Vidyalankar Shikshan Sanstha and all professors of senior college and junior college visited the Exhibition. All Teachers of Utkarsha Bal Mandir also visited the exhibition.

The Core collection presented in the exhibition includes reference collection and multi-volume works related to Indian history. In addition to this, in-depth chronological Indian history was presented by bifurcating topics as ancient, medieval and modern Indian history. Books and newspaper cuttings related to the history of the Indian currency was also presented in the exhibition. Book jackets of reference books were put on library notice boards.

The exhibition was visited by students of senior college and students of junior college. Total 270 students visited the exhibition.

Tuesday 27 February 2018

मराठी भाषा दिन २७.०२.२०१८


Om Vidyalankar Shikshan Sanstha’s
  Asmita College of Arts & Commerce
For Women
   ·  Affiliated to Mumbai University  ·
=============* ASMITA COLLEGE CHOWK, KANNAMWAR NAGAR NO.2, VIKHROLI (EAST), MUMBAI- 400 083 * ===============
मराठी भाषा दिन
अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालात मंगळवारी दिनांक २७/०२/२०१८ रोजी मराठी साहित्याचे सम्राट वि. वा. शिरवाडकर म्हणजेच "कुसुमाग्रज" यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


यानिमित्त संकल्प असोसिअशन तर्फे 'मराठी भाषीय विद्यार्थिनींनसाठी नोकरीच्या नवीन संधी' या विषयावर S. Y. B. A. व T. Y. B. A. च्या विद्यार्थिनींसाठी परिसंवाद  आयोजित करण्यात आला. या परिसंवादामार्फत  मराठी भाषिक विद्यार्थिनींना व्यवसाय व नोकरी साठी उपलब्ध असलेल्या विविध संधींविषयी माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम अतिशय माहितीपूर्ण व परस्परसंवादी होता.


F. Y. B. A. च्या विद्यार्थिनींसाठीसाठी 'कुसुमाग्रज यांचा जीवनपट व साहित्य' या विषयावर कार्यक्रम आयोजित केला. F. Y. B. A. ची विद्यार्थिनी मनाली आपटे हिने प्राचार्य डॉ. एच एस गोर्गे , उपप्राचार्य प्रोफ. मनीषा नायर व उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थांचे स्वागत करून कार्याक्रमची सुरेख सुरुवात केली. त्यानंतर प्राचार्यांनी दीपप्रज्वलन करून मराठी भाषा दिनाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. उपप्राचार्यांनी मराठी भाषा व भाषेचा रोजच्या जीवनातील वापराबाबत मार्गदर्शनपर भाषण केले.

विद्यार्थिनी काजल पेडणेकर, श्रद्धा गमरे, ऐश्वर्या जाधाव यांनी कुसुमाग्रजांबद्दल माहिती सांगितली. तर नेत्रा महाकाळ हिने त्यांच्या प्रसिद्ध नाटकांचा थोडक्यात परिचय दिला. अश्विनी नलावडे, दिपाली पाटील, सुजाता सकुडे, सुवर्णा पगारे, कांचनी  जाधव, भाग्यश्री इंगळे, शिवानी थवी, प्रिया केदारे, अश्विनी पोवार, ऋतुजा राक्षे, लक्ष्मि जाधव, विजिता शेडेकर यांनी कुसुमाग्रजांच्या व इतर प्रसिद्ध कवी व कावियात्रींच्या कवितांचे सुरेख सादरीकरण केले.
सदर मराठी राजभाषा गौरव दिन F. Y. B. A. ला मराठी शिकविणIर्या प्राध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला गेला. या कार्यक्रमाची सांगता तेजल मोरे या विद्यार्थिनीने केली व उपस्थित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थिनींनच्या सहकार्याबद्दल आभार मानले.



तसेच अस्मिता कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील ग्रंथालयात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी साहित्यावर ग्रंथ व भित्तीपत्रके मांडण्यात आली.

अशा विविध कार्यक्रमांतून मराठी भाषेचा जागर व मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा संदेश विद्यार्थिनींनना देण्यात आला.

Monday 23 January 2017

अस्मिता महाविद्यालयाचे 'थिंक ग्रीन गो ग्रीन' ग्रंथप्रदर्शन




अस्मिता महाविद्यालयात १७ जानेवारी, २०१७ रोजी 'थिंक ग्रीन गो ग्रीन' या संकल्पनेवर आधारित 
ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन अस्मिता महाविद्यालयाचे संस्थापक श्री. मधुकर नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अस्मिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. गोरगे, उपप्राचार्या प्रोफ. मनीषा नायर व सौ. तृप्ती वाघधरे उपस्थित होत्या.
या प्रदर्शनात पर्यावरण संवर्धनासंबंधित घोषवाक्ये, भित्तीपत्रके वृत्तपत्रीय 
कात्रणे लावण्यात आली होती. तसेच या संकल्पनेला अनुसरुन पुस्तके व पर्यावरण 
विषयक ज्ञानकोश मांडण्यात आले होते. या व्यतिरिक्त पर्यावरण संवर्धनाविषयी  
जागरूकता निर्माण करण्यासाठी चित्रफीत दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी या 
प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद दिला.